Thursday, October 17, 2013

रोहिणीचे पत्र - १

Subject: मैत्री करायची का?
    Date: Fri, 17 Oct 2013 16:00:00 +0530
   From: Rohini Dixit <rohinidixit79@gmail.com>
       To: Rohit <rohitcreative88@gmail.com>

तुमच्याशी सविस्तर बोलणे झाले नाही म्हणून तुम्हाला मी मेल एड्रेस मागितला.  तुम्ही तुमच्या वागण्या बोलण्यातून एक चांगले मनुष्य आहात असे वाटते म्हणून तुम्हाला सांगावेसे वाटलेय.  तुम्ही मी क्लास ला येताना आणि जाताना समोर रोज उभे असता आणि माझ्याकडे पाहत असता.  हे माझ्या मैत्रीनींच्याही लक्षात यायला लागले आहे आणि त्या मला त्यावरून चिडवायला लागल्या आहेत.  तुम्ही असे माझ्याकडे बघणे बंद करावे म्हणजे मला अॅकवर्ड होणार नाही.

आपले त्यादिवशी ट्रीप मधे बोलणे झाले असले तरीही आपली अजून ओळख अशी नाही.  मला तुमच्याबद्दल काही माहित नाही आणि तुम्हाला माझ्याबद्दल पण तुम्ही एक इंटरेस्टींग केरेक्टर आहात हे मला त्या दिवशी च्या तुमच्या कृतीतून कळले.  तुम्हाला चालणार असेल तर मला इमेल मधून मैत्री करायला आवडेल.  पण ते एकटक पाहणे बंद करा, किमान माझ्या सर्व मैत्रीनी माझ्याबरोबर असताना त्यांना मला चिडवायला काही कारण नको.

तुम्ही काय शिकलेले आहात? तुम्ही काय नोकरी करता? हे सांगाल का?  तुमची काही अधिक माहिती पण सांगा.  तुम्ही आमच्या क्लास च्या सहलीला कसे आलात ते पण सांगा. 

रोहिणी. 

No comments:

Post a Comment